Monday, March 9, 2026

'ढ' या बालकादंबरीविषयी कु.चेरी तायडे (इयत्ता पाचवी) या बाल साहित्य रसिकाचा अभिप्राय तिच्याच शब्दात...

             दुपार झाली होती. माझे काका मला भेटायला आले होते. मला ते काहीतरी गंमत आणणार होते. ती गंमत होती त्यांचं एक 'ढ' नावाचं पुस्तक. त्यांनी मला दिलं. पाहता क्षणी ते मला आवडलं. पुस्तकाच्या कव्हरवर एक मुलगा बसलेला होता, त्याच्या खांद्यावर एक मांजर होती. तो मुलगा ता-यांकडे बघत होता, आणि खाली जमिनीवर दप्तर ठेवलं होतं. फारच सुंदर चित्र होतं. मला ते पुस्तक वाचावं असं वाटलं. 

            मी ते पुस्तक वाचायला लागले. वाचता वाचता मला ती गोष्ट खूपच आवडली. त्या गोष्ट मधला जो मुलगा होता त्याचं नाव गजानन होतं. आणि त्याच्या मांजरीचं नाव होतं सोनी. गजाननला जसे चित्र काढायला आवडतं तस मलाही चित्र काढायला आवडतं. त्या पुस्तकात एक घटना येते की गजू मांजरीचे नख कापायला जातो तेव्हा मांजर घाबरून त्याच्या हातावर पंजा मारते. गजू खूप मोठ्या मोठ्याने रडतो. त्याची आई त्याला जवळ घेऊन मांजरीला शिव्या श्राप देते, आणि मांजरीला बाहेर हाकलून काढते. गजूची आई मांजरीला हाकलून काढल्यामुळे मला रडू आलं होतं. तो त्याच्या आईशी खरं बोलायला पाहिजे होतं! पण तो सोनीचे नखं कापायला गेला त्यामुळे त्याची आई मारेल या भीतीने तो जे घडले ते सांगितलं नाही.

             गजूची एक मॅडम आहेत. त्यांचं नाव कदम मॅडम आहे. त्या मॅडम खूप खूप प्रेमळ आहे. जर गजूला काही समजलं नाही तर ते त्याला समजून घेतात. माझ्या आईने मला एक टेन्ट हाऊस घेऊन दिलं होतं. त्या टेन्ट हाऊसमध्ये मी हे पुस्तक वाचत होते. मला खूप मज्जा यायची. खरंतर हे माझं पहिलं पुस्तक आहे जे मी पूर्णपणे वाचल आहे. आणि माझ्या आई पप्पाची मदत न घेता वाचली आहे. मी पुस्तक वाचताना चार-पाच तास कधी गेले हे मला काहीच माहित नाही. 


मी या पुस्तकातून शिकले कोणाला 'ढ' म्हणायला नाही पाहिजे. जर कोणी अभ्यासात कमी असेल तर इतर गोष्टीत हुशार असेल. आणि कोणाचं मन दुखायला नाही पाहिजे. कोणाची मजा उडवायला नाही पाहिजे. तर आपण मदत करायला पाहिजे. खोटं बोलायला नाही पाहिजे. आणि जे खर आहे ते बोलायला पाहिजे. खरतर मला टायपिंग जमत नाही त्यामुळे मी फोनच्या माईकवर बोलते. आणि ते लिहून येते. थैंक्यू काका हे पुस्तक दिल्या बद्दल...

@चेरी तायडे 

No comments: